आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:नगरमध्ये दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप ; डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे आयोजन

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अहमदनगर जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्यांग) पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी मोफत सहाय्यक साधनांचे वाटप बुधवारी नगर शहरातील केडगाव येथे झाले. मोफत सहाय्यक साधनांचे वाटप व तपासणी शिबीराचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे , जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्या उपस्थितीत पार पडले. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त १२०० दिव्यांग लाभार्थ्यांची या शिबीरात तपासणी करण्‍यात आली असून, ६० पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वॉकर, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, कुबड्या, अंधांसाठी मोबाईल फोन, श्रवण यंत्र या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांच्या अडचणी दूर होऊन त्यांना सामान्य माणसाप्रमाणे जगता यावे, यासाठी लागणारे सहाय्य साहित्य हे पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले. माजी महापौर बाबा वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, विवेक नाईक, गणेश नांनावरे, ऋग्वेद गंधे, जगन्नाथ निंबाळकर संजय गिरवले, जालिंदर कोतकर सामाजिक कार्यकर्ते, नगरसेक मनोज कोतकर, राहुल कांबळे, लता शेळके, रवी बारस्कर, संजय ठोने, अजय चितळे, निखिल वारे, सुनील कोतकर आदी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...