आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​जनजागृती:संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून मोफत चष्म्यांचे वाटप ; वाढदिवसानिमित्त चांदेकसारे येथे उपक्रम

कोपरगाव शहर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे निमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील रुग्णांना संजीवनी युवा प्रतिष्ठाच्यावतीने भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते चांदेकसारे येथे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी संचालक संजय होन होते.

माजी सरपंच केशव होन यांनी प्रास्तविक केले. संचालक ज्ञानेश्वर होन यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येऊन त्याचे नामकरण शंकरराव कोल्हे सामाजिक सभागृह केले. चांदेकसारे ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या दोन वर्षात ३५ लाख ८४ हजार रुपये खर्चाच्या पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण तसेच ३३ लाख ८७ हजार रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी क्रांती केली. त्यातून गोर-गरिबांचे कल्याण केले. बिपीन कोल्हे हे त्यांचा वाढदिवस शाल-श्रीफळ सत्कार न घेता, समाजाप्रती आपण काही तरी देणं लागतो म्हणून हुशार गरीब मुलांना मोफत शालेय वह्यांच्या वाटपाचा उपक्रम १३ वर्षांपासून सुरू आहे. संजीवनी उद्योग समूह, नीलवसंत फाउंडेशन, संजीवनी युवा प्रतिष्ठान व मणिशंकर आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करतात. चांदेकसारेत रुग्णांना गुरुवारी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अंकुश महाराज जगताप, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक निवृत्ती बनकर, विश्वासराव महाले, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, बापुसाहेब बाराहाते, बाळासाहेब वक्ते, नीलेश देवकर, शिवाजी वक्ते, अरुण येवले, अशोक औताडे, अप्पासाहेब औताडे, कामगार नेते मनोहर शिंदे, गणपत दवंगे, रावसाहेब होन, अप्पासाहेब होन, द्रोणाचार्य होन, प्रल्हाद पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...