आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इब्टाच्या वतीने जाहीर:आदर्श शिक्षक पुरस्कारांचे श्रीगोंद्यात वितरण ; प्रशांत चव्हाण यांना प्रदान

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदर्श बहुजन शिक्षक संघ इब्टाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिा फुले आदर्श शिक्षक, क्रांतीज्योती सावित्री फुले आदर्श शिक्षीका व दीनमित्रकार पत्रकारिता पुरस्कार नुकतेच श्रीगोंदे येथे प्रदान करण्यात आले. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे राजलक्ष्मी मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात दिव्य मराठीचे पत्रकार दीपक कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार तर आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक समाज प्रबोधनकार पुरस्कार प्रशांत चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, इब्टाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, आबासाहेब जगताप, शाम पिंपळे, माजी सभापती शहाजी हिरवे ,गट शिक्षणधिकारी गोरख हिंगणे, बबन गाडेकर, भास्कर कराळे, किसन बोरुडे, विजय काकडे, संतोष टकले, नवनाथ अडसूळ, संदीप नागवडे, रवींद्र होले, रमेश सोनवणे आदी उपस्थित होते. श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे १५ आदर्श शिक्षक व १५ आदर्श शिक्षीकांना पाचपुते यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात उत्तरेश्वर मोहळकर यांनी, आमदार बंब यांच्याकडे लक्ष न देता नेटाने आपले विद्यार्थी हिताचे काम करावे असे आवाहन केले. विद्यार्थी हिताचे आम्हाला फक्त शिकवू दया हे आंदोलन समाजाच्या सहकार्याने तीव्र करून शिक्षणातील अडथळा दूर करून शेतकरी कष्टकरी कामगार बहुजन समाज यांच्या मुलांची प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आभार रोहिदास डोके यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...