आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य वाटप:मुलगी जन्माला आल्याने विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या उन्नतीला जितके पुरुष जबाबदार आहेत, त्याच तुलनेत स्त्री शक्ती ही तितकीच प्रगल्भ आणि कार्यशील आहे. त्यांचे सक्ष्मीकरण व्हावे यासाठी सामाजिक कार्याची कास ही लिनेस क्लबच्या माध्यमातून जोपासली जात आहे. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान हे महत्वपूर्ण राहिले अाहे, असे प्रतिपादन मल्टिपल प्रेसिडेंट डॉ.वर्षा झंवर यांनी केले.

येथील साई हेरिटेज व्हिलेज येथे आयोजित ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टीपल चतुर्भुजा अंतर्गत डिस्ट्रिक्ट एमएच-३ गोदातरंग २०२२ च्या साई माऊली लिनेस स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. यादरम्यान रजनीताई गोंदकर लिखित साई संकल्प डिरेक्टरी व गोदातरंग पिन वितरण करून प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी शोभा गोंदकर उपस्थित होत्या. ज्योती शिंदे यांनी अतिथी परिचय करून दिला तर अर्चना जगताप डिस्ट्रिक्ट रिपोर्ट तर माधुरी शिंदे यांनी ट्रेझरी रिपोर्ट वाचून दाखवला.

रजनी गोंदकर म्हणाल्या, स्त्रीला जन्मतःच समाजसेवेच बाळकडू मिळत असते. स्त्री जेव्हा मैत्री, ऐक्य, सेवा हे ब्रीद घेऊन समाज कार्यास स्वतःला वाहून घेण्यास सुरुवात करते, तेव्हा समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. याप्रसंगी अंजली विसपुते, छाया रजपूत, अलका डोंगरे, नंदिनी गोखले आदींनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...