आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम‎:श्रीगाडगेबाबा आश्रम शाळेतील‎ मुलांना शालेय साहित्य वाटप‎

‎ कुकाणे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ व‎ गोल्डन ग्रुपच्या वतीने नेवासे तालुक्यातील‎ भानसहिवरा येथील श्रीगाडगेबाबा आश्रम‎ शाळेतील शंभर मुलांना भोजन देऊन‎ शालेय साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम‎ राबवण्यात आला.‎ गोल्डन ग्रुप व आमदार गडाख मित्र‎ मंडळाचे मार्गदर्शक सुनील धायजे यांच्या‎ पुढाकाराने हा उपक्रम उदयन गडाख व डॉ.‎ निवेदिता गडाख यांच्या विवाह सोहळयाचे‎ औचित्य साधून राबवण्यात आला.

यावेळी‎ गाडगेबाबा आश्रम शाळा प्रांगणात झालेल्या‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते‎ सुनील धायजे हे होते. नितीन खरात,मुळा‎ कारखान्याचे संचालक नारायणराव‎ लोखंडे, शिवाजी पाटील, अॅड. चंद्रकांत‎ कदम, गोरख भिंगारदिवे, विनायक‎ नळकांडे, पंकज जेधे, सुशील धायजे,‎ बाळू ठोंबरे, डॉ. डांगे, राजू इंगळे, छाया‎ धायजे, ज्योती धायजे, शीतल खरात,‎ मनिषा धायजे, रमा धायजे, अक्षदा धायजे,‎ शिक्षक मच्छिंद्र गमे यावेळी उपस्थित होते.‎ उपस्थित पाहुण्यांचे आश्रम शाळेचे‎ मुख्याध्यापक नितीन कांबळे यांनी स्वागत‎ केले. यावेळी गाडगेबाबा आश्रम शाळेतील‎ उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे‎ वाटप करण्यात येऊन भोजन देण्यात आले.‎ सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उत्कृष्ट‎ कार्याबद्दल सुनील धायजे यांचा यावेळी‎ सत्कार करून गौरव करण्यात आला.‎ आभाार आश्रम शाळेचे अधीक्षक सुरेश‎ खांडवे यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...