आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेशाचे वाटप:अस्तगावच्या प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अस्तगाव येथील गोर्डे वस्ती या प्राथमिक शाळेतील तसेच अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना एका तरुणाने शालेय गणवेशाचे वाटप केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन अस्तगाव येथील गौरव भास्कर कांदळकर व कल्पना कांदळकर यांनी गोर्डे वस्ती येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप केले.

त्यांच्या या दानशुरतेबद्दल कांदळकर यांचा अंगणवाडीच्या मेढेकर व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ठकाजी खेमनर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी अंगणवाडीच्या अधिकारी तांबे, संगिता गोर्डे, पंचायत समितीचे माजी सभापती निवास त्रिभुवन, ग्रामपंचायत सदस्य संतोष गोर्डे, रंगुबाई कातोरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...