आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते आठवीतील सर्व मुली, अनुसुचित जाती, जमातीची मुले व दारिद्र्य रेषेखाली मुलांना प्रत्येकी दोन गणवेश वाटपाचे नियोजन आहे. जिल्ह्यात गणवेश वाटप योजनेंतर्गत 1 लाख 55 हजार 488 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश खरेदीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर 9 कोटी 32 लाख 92 हजार 800 रूपये तालुकास्तरावर उपलब्ध झाले आहेत.
13 जूनला शाळेची पहिली घंटा वाजणार असून पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा विभागांतर्गत गणवेश खरेदीचे नियोजन आखण्यात आले आहे. तथापि, तालुकास्तरावरून मुख्याध्यापकांच्या खात्यावर पैसे ऑनलाईन जमा करण्याची कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नसल्याने पहिल्याच दिवशी गणवेश वाटप होण्याची शक्यता कमी आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
गणवेशाची योजना कशी ?
समग्र शिक्षा अभियानांतर्गत 2022-2023 वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत (एसएमसी) गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. या उपक्रमात जिल्ह्यातील पहिली ते आठवीतील 1 लाख 55 हजार 488 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. आता तालुकास्तरावरून मुख्याध्यापकांकडे पैसे वर्ग झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी करणार आहे.
तालुकानिहाय विद्यार्थी संख्या अशी
पहिली ते आठवीत अकोले 14 हजार 423, जामखेड 6 हजार 911, कोपगाव 12 हजार 810, कर्जत 8 हजार 855, नगर 10 हजार 410, नेवासे 15 हजार 277, पारनेर 9 हजार 448, पाथर्डी 9 हजार 200, राहुरी 12 हजार 258, राहाता 9 हजार 593, शेवगाव 9 हजार 409, संगमनेर 15 हजार 916, श्रीगोंदे 12 हजार 232, श्रीरामपूर 8 हजार 646 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.