आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:पद्मशाली कडून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतुन आपण गरजूंसाठी कार्य केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटते आपण चांगले शिक्षण घेवुन मोठे झालो पाहिजे. परंतु आर्थिक परस्थिती नसल्याने काहींचे स्वप्न अपुर्ण राहतात. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली, तर ते आपले ध्येय गाठण्यासाठी धाव घेतील. शिक्षणांची आवड निर्माण होऊन एक चांगली पिढी तयार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रशांत कोक्कुल यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयातील २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव अजय लयचेट्टी, विद्या प्रसारक मंडळाचे संचालक राजू म्याना, जितेंद्र वल्लाकट्टी, मुख्याध्यापक दिपक रामदिन, श्रीनिवास मुत्याल, अमित सुंकी, आकाश अरकल, विशाल द्यावनपेल्ली, शुभम सुंकी, मयुर जिंदम, वैभव अरकल, श्रीनिवास बुरगुल, योगेश न्यालपेल्ली आदि उपस्थित होते.

कोक्कुल म्हणाले, पद्मशाली सोशल फाऊंडेशन नेहमी विद्यार्थ्यांना मदत मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न असतो. फाऊंडेशनच्या वतीने सात वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखीनय कार्य करत आहेत. त्यामुळे गरजू लोकांना आणि विद्यार्थ्यांना लाभ होत आहे, असे म्हणाले. प्रास्तविकात सचिव लयचेट्टी म्हणाले, स्वातंत्र्य दिन सामजिक उपक्रमांनी साजारा व्हावा आणि त्यामाध्यमातुन गरजुंना मदतीचा हात मिळवा, यासाठी बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. त्यांनी फाऊंडेशच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीनिवास बुरगुल यांनी केले. तर आभार शुभम सुंकी यांनी मानले. यावेळी शिक्षक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...