आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संगमनेर:कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवर दाखल गुन्हा जिल्हा कोर्टाकडून रद्द

संगमनेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुत्रप्राप्तीच्या वक्तव्यावरून वादग्रस्त ठरलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांविरुद्ध दाखल गुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी रद्द केला.

सम-विषम तिथीला स्त्री-पुरुष संबंधांतून पुत्रप्राप्ती होत असल्याबद्दलचे वक्तव्य इंदोरीकर यांनी एका कीर्तनात केले होते. याबाबत अंनिसने जिल्हा शल्यचिकित्सकाकडे तक्रार केली होती. त्यानंतर गर्भलिंग निदान कायद्याचे कलम २२/१/२ चे तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी ३ जुलै रोजी इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने प्रोसेस इश्यू बजावण्यात आला होता. अंनिसच्या वतीने अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. तथापि, मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द ठरवला. इंदोरीकरांच्या वतीने अ‍ॅड. के. डी. धुमाळ, तर सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अरविंद राठोड यांनी काम पहिले.

बातम्या आणखी आहेत...