आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासा तालुका मैदानी क्रीडा स्पर्धा यश अकॅडमी, सोनईच्या मैदानावर नुकत्याच पार पाडल्या. यात संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय लोहोगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले. विविध क्रीडा प्रकारात सुयश संपादन करत विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. या स्पर्धेत १४ वर्षे वयोगट आर्यन घाडगे हा गोळाफेकमध्ये प्रथम, करण ढेरे हा थाळीफेक प्रथम, भक्ती वाघ गोळाफेक प्रथम, समृद्धी येळवंडी ४०० मीटर धावणेत प्रथम, श्वेता ढेरे ६०० मीटर धावणेत प्रथम, रिद्धी येळवंडे थाळीफेकमध्ये द्वितीय, विद्या पठारे लांब उडीत द्वितीय, १७ वर्षे वयोगटात ऋतुजा खंडागळे ८०० मीटर धावणेत प्रथम, अक्षदा खंडागळे १०० मीटर धावणेत प्रथम, ऋतुजा खंडागळे ४०० मीटर धावणेत द्वितीय, गायत्री खंडागळे १०० मीटर धावणेत द्वितीय, रेणुका घुले १५०० मिटर धावणेत द्वितीय आली.
तसेच सांघिक स्पर्धेत देखील लोहोगाव विद्यालयातील १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ तालुक्यात उपविजेता ठरला. या सर्व खेळाडूंचा ग्रामस्थांनी फेटा बांधून सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच आशा ढेरे होत्या. उपसरपंच बाप्पू कल्हापुरे, ग्रामपंचायत सदस्य निसार सय्यद, बाजीराव जाधव, सरपंच आदिनाथ पटारे, आण्णासाहेब ढेरे, स्कूल कमिटी सदस्य भास्कर जाधव, रवींद्र घाडगे, संतोष ढेरे, अंकुश ढेरे, दीपक खंडागळे आदी उपस्थित होते.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष ढेरे, जालिंदर टेमक, मुख्याध्यापक रामचंद्र सुपे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्रशासनाधिकारी डॉ. अशोक तुवर, स्कूल कमिटी सदस्य भाऊसाहेब राजळे, आदींनी अभिनंदन केले आहे.
खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून लोहोगाव ग्रामस्थांनी १२ हजार रुपयांचे २४ खेळाडूंना स्पर्धेसाठी आवश्यक लागणारे साहित्य देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सोनवणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालयाचे सर्व कर्मचारी प्रयत्नशील होते.
अभिमानास्पद बाब
संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय लोहोगाव मधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारात यश संपादन करत त्यांची जिल्हा स्तरावर निवड झाली. ही बाब अभिमानास्पद आहे.''-उदयन गडाख, उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.