आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनाय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदे आयोजित रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. यात जिल्ह्यातील दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेसाठी रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर व प्राचार्य विश्वास काळे, तालुका क्रीडा समिती अध्यक्ष बापूराव गायकवाड, पारनेर तालुका क्रीडा समिती अध्यक्ष बापूसाहेब होळकर, उपप्राचार्य महादेव जरे, शहाजी मखरे, सिकई असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत राहीज, नितीन थोरात, रयत बँकेचे संचालक प्रशांत खामकर यावेळी उपस्थित होते. दहा खेळाडूंची विभागीय स्पर्धेत निवड झाली.

यश शिंदे, राज शिंदे, बालाजी माने, ऋषी भिसे, कृष्णा कोळपे, नागेश पवार, मुली - ऋतुजा दरेकर, सुवर्णा कोकाटे, दिक्षा पवार यांना सुवर्णा पाचपुते यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. खेळाडूंना संजय अहिवळे, बागुल कल्पना, संजय डफळ व संतोष जाधव तसेच शिकई असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत राहिंज यांनी नियोजन केले. स्पर्धेस पंच म्हणुन योगेश वागस्कर, वैशाली बांगर, प्रदीप चेडे, शुभम राहीज, तृप्ती कुंभार व प्रतीक्षा राहीज यांनी उत्कृष्ट काम केले.

बातम्या आणखी आहेत...