आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदारपणे वाटचाल:भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे मलेशिया अभ्यास दौऱ्यावर

संगमनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षण संस्था रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेले भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे यांची मलेशिया येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणखी दमदारपणे वाटचाल करत आहे.

प्रबोधिनी त्यांच्या प्रशिक्षित युवकांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे आयोजित करत असते. या माध्यमातून यापूर्वी ॲड. डेरे इस्राएल येथे अभ्यास दौऱ्यावर गेले होते. या देशांमध्ये सुरू असलेली विकासकामे, परराष्ट्र संबंध, प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेते यांच्यासोबत संवाद अशा विविध मुद्द्यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश केला जातो.

बातम्या आणखी आहेत...