आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:राष्ट्रवादीसाठी राजकीय मोर्चेबांधणीचा पाडवा, जिल्हाध्यक्ष फाळके यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद निवडणुकांना अद्याप मुहूर्त लागलेला नाही, परंतु, स्थानिक पातळीवरूनच मोर्चेबांधणी करण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शनिवारी (२ एप्रिल) जिल्हाभर ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना गावात एक तास पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा घडवण्याचे फर्मान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले. या चर्चेचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले.

सेवा सोसायटींच्या निवडणुका आटोपल्या असल्या तरी ग्रामीण राजकारण जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल केव्हा वाजणार? या चर्चेनेच ढवळून निघाले आहे. आरक्षण, गटरचना या विषयांवरही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीने या उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीवरूनच पक्ष संघटन भक्कम करण्याची तयारी केली आहे.

निवडणुकांसाठी सज्ज
विधानसभा, विधानपरिषद किंवा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका केव्हाही, झाल्या तरी आम्ही सज्ज आहोत. मग जिल्ह्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले, तरी आम्ही न विजयी घोडदौड कायम ठेवू.'' राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...