आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशंसा:कोरडगावचे साळुंखे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार ; पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरडगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी असलेले व जिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले अण्णासाहेब साळुंखे यांना जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.२००५ या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले होते. शेवगाव तालुक्यातील रामनगर तांडा भागातील लमानवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी विविध उपक्रम राबवले होते. विशेषतः पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. २०१२ साली ही शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची आदर्श शाळा म्हणून जाहीर झाली होती. २०१३ यावर्षी पाच विद्यार्थ्यांना संगणकावर शिक्षण देऊन एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण करून घेतली. त्यावेळी जिल्ह्यात या शाळेने प्रशंसा मिळवली होती.

यात साळुंखे यांनी मोठा पुढाकार घेतला होता. कळसपिंपरी गावातील लमानवस्ती येथील शाळेतही डिजिटल शाळा व लोकसहभागातून मोठे उपक्रम राबवले होते. त्यावेळी राज्यभर या शाळेचे नाव गाजले होते. अत्यंत हलकीच्या परिस्थितीत शिक्षण घेत साळुंखे यांनी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवले. त्यांना जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुढच्या कामासाठी निश्चितपणे प्रोत्साहन मिळणार : साळुंखे अत्यंत हलकीच्या परिस्थितीतून मी स्वतः शिक्षण घेतल्यानंतर मला माझ्यासारख्याच इतर गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी उपक्रम राबवण्याची कल्पना सुचली. ती कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी मला अन्य शिक्षकांबरोबरच पालकांचेही सहकार्य लाभले. त्यामुळेच मला गोरगरीब मुलांसाठी काम करता आले. या पुरस्कारातून मला निश्चितपणे पुढच्या कामासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब साळुंखे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...