आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:विभागीय आयुक्त गट-गण रचनेच्या आराखड्याला 22 जूनला देणार मंजुरी; नगर जिल्हा परिषदेच्या गट-गणांचा प्रारूप रचना आराखडा जाहीर

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू झाली असून,नगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट -गण रचनेची प्रारूप अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध झाली. यावर ८ जून पर्यंत नागरिकांच्या हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या ८५ गटांचा व पंचायत समितींच्या १७० गणांचा आराखडा गेल्या महिन्यात ९ में ला महसूल प्रशासनाने राज्याच्या निवडणूक आयुक्तांना सादर केला होता. त्यानंतर गुरुवारी (२ में) ला जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या गट -गणांच्या प्रारूप रचनेचा आराखडा जाहीर झाला आहे. या प्रारूप रचनेवर ८ जून पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर २२ जून ला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे गट व गण रचना अंतिम करणार आहेत. २७ जूनला गट - गण रचना प्रसिद्ध होणार आहे.

विद्यमान सदस्यांसह नव्या इच्छुकांची मोर्चेबांधणी
नगर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत मार्च महिन्यात संपली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशासक नियुक्तीमुळे जिल्हा परिषद निवडणूक देखील लांबणीवर पडली होती. आता प्रशासकीय स्तरावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, विद्यमान सदस्यांसह नव्या इच्छुकांनी देखील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...