आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:संगमनेर उपविभाग महसूल यंत्रणेने थेट 27 हजार विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन दिले शालेय दाखले व संगणीकृत प्रमाणपत्रे

अहमदनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर उपविभागात महसूल यंत्रणेच्या समन्वयातून शाळा व महाविद्यालयाचे निकाल लागण्यापूर्वीच 27 हजार विद्यार्थ्यांना थेट घरोघरी जाऊन शालेय दाखले व संगणीकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. ऐनवेळी विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ होऊ नये यासाठी हा अभिनव उपक्रम महसूल प्रशासनाने राबवला आहे. अशी माहिती अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी शुक्रवारला दिली.

महसूल यंत्रणेच्या समन्वयातून प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन ते अद्यावत संगणीकृत करणे तसेच तहसील कार्यालयातूनच नोंदी काढून ते अद्यावत करण्याची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली होती. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांची दाखले व प्रमाणपत्र घेण्यासाठी धावपळ व्हायची. त्यांचा तो वेळ वाचावा म्हणून थेट विद्यार्थ्यांना घरपोहच दाखले व प्रमाणपत्र देण्याचा वेगळा उपक्रम संगमनेर उपविभागात राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत या विभागात आतापर्यंत 27 हजार दाखले व प्रमाणपत्र थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन देण्यात आले आहेत. असे निचित यांनी सांगितले.

पालकांचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाचला

यापूर्वी महसूल विभागाने अनेक उपक्रम राबवले आहेत. संगमनेर उपविभागात राबवण्यात आलेल्या या वेगळ्या उपक्रमामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा सेतू केंद्रावर व शाळेत जाण्याचा वेळ वाचला आहे. असे निचित यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...