आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Dnyaneshwar Ranks Third In The State In Crushing 16.61 Lakh Metric Tonnes Of Sugarcane; Information Of Narendra Ghule, President Of Dnyaneshwar Sahakari Sugar Factory |marathi News

विक्रमी गाळप:16.61 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ‘ज्ञानेश्वर’ राज्यात तिसऱ्यास्थानी; ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांची माहिती

कुकाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या ४८ व्या गळीत हंगामात १६ लाख ६१ हजार मेट्रिक टन उसाचे उच्चांकी गाळप केले. ऊस गाळपात सहकारी कारखान्यामध्ये ज्ञानेश्वर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी दिली.

भेंडे येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगामाची सांगता. कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांचे हस्ते झाली. यावेळी माजी आमदार चंदशेखर घुले, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष घुले यांनी सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११ कोटी ६१ लाख ३२ हजार १३३ युनिट वीज निर्मिती झाली. त्यापैकी ७ कोटी ४ लाख ५१ हजार ३२० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली. आज अखेर ऑइल कंपन्यांना ८० लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा ही करण्यात आलेला आहे. पुढील हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू होईल या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष अभंग यांनी गळीत हंगाम १८० दिवसांचाच असला पाहिजे. पुढील हंगामात प्रतिदिन १० हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी कार्यक्षेत्रात२१ लाख टन ऊस उपलब्ध होता.या हंगामात १६ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते, ते पूर्ण करून २२० दिवसात १६ लाख ६१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले. १३ लाख ७८ हजार ५०० क्विंटल पांढरी साखर तर ३ लाख २० हजार ५०० क्विंटल रॉ शुगर उत्पादित केली. देशात उत्पादित होणारी अतिरिक्त साखर उत्पादनाला केंद्र सरकारने दिलेल्या सर्व पर्यायांचा आपण वापर करून साखर निर्यात केली.रॉ-शुगर तयार करण्यात आली. बी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे.

कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, प्रा. नारायण म्हस्के, गणेश गव्हाणे, एस. डी. चौधरी, महेंद्र पवार, चिफ इंजिनिअर राहुल पाटील, शेतकी अधिकारी सुरेश आहेर, कारभारी गायके, कल्याणराव म्हस्के, विलास लोखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालनभाऊसाहेब सावंत यांनी, तर आभार संचालक पंडितराव भोसले यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...