आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम सुरू:ज्ञानेश्वरी हस्तलेखनाचा उपक्रम सुरू; संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार

सोनई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या संयुक्त संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा पुर्तीच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलेखन उपक्रम सुरू करण्यात आला. मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांच्या हस्ते भाविकांना सहाशे पाणी वह्या विनामूल्य देण्यात आल्या.

हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथ एक वर्षभरात लिहून पूर्ण करावयाचा असून लिखानासाठी मामासाहेब दांडेकर यांनी प्रकाशित केलेली ज्ञानेश्वरी पारायण प्रत वापरावी लागणार आहे. या वर्षभराच्या उपक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी रोज किमान ३० ओव्या लिहून पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. शिवाजी महाराज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, रामभाऊ जगताप, ज्ञानदेव शिंदे, कैलास जाधव, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगणे, सतीश पिंपळे, अण्णा पेचे, नंदकुमार पाटील, लक्ष्मण जगताप, काशीनाथ नवले, विक्रम चौधरी, महेश मापारी, आशिष कावरे, जालिंदर गवळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...