आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ज्ञानेश्वरी त समाजाला संजीवनी देणारे विचार

संगमनेर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शत्रूशी रणांगणात दोन हात करणारा शूर असावाच लागतो, पण आध्यात्मिक प्रवाहात समरस होणारा त्याही पेक्षा शूर असावा लागतो. कारण, त्याचे युद्ध स्वतःशी असते. ते जिंकणे तुलनेने कठीण असते. म्हणून, जिंकताना योद्ध्याचा कस लागतो. तरुण, वृद्ध, पुरुष, महिला अशा सर्वांसाठी ज्ञानेश्वरी मधील मार्गदर्शक विचार अनमोल आहेत. समाजाला संजीवनी देणारा सात्विक आणि पोषक विचारांचा खजिना ज्ञानेश्वरीत आहे, असे प्रतिपादन निरुपणकार धनश्री लेले यांनी केले.

राजस्थान युवक मंडळाने ‘अमृत मंथन’ या विषयावर लेले यांच्या दोन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, खजिनदार व्यंकटेश लाहोटी, सचिव आशीष राठी, कैलास राठी यावेळी उपस्थित होते.

लेले यांनी ज्ञानेश्वरी मधील विचार वैभव रसिकांना उलगडून दाखवले. श्रीकृष्ण-अर्जुन यांचे अनोखे नाते आणि त्यांचे अर्थपूर्ण तात्विक संवाद त्यांनी मथितार्थासह समजावून सांगितले. अनेक बोधकथा व आध्यात्मिक दाखले देत लेले यांनी ज्ञानेश्वरीवरील निरुपण खूप उंचीवर नेऊन ठेवल्याने श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला.

मनिष मालपाणी यांनी संगमनेरच्या रसिक श्रोत्यांची खूप वर्षांची इच्छा धनश्री लेलेंच्या व्याख्यानाने आज पूर्ण करण्याची संधी राजस्थान युवक मंडळाला मिळाली, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. डॉ. संजय मालपाणी यांनी लेले यांच्या रूपाने साक्षात सरस्वती ज्ञानेश्वरी मधील वैचारिक खजिना मांडणार असल्याची भावना व्यक्त केली. रचना मालपाणी यांनी परिचय करुन दिला. सूत्रसंचालन ओम इंदाणी यांनी, तर आभार आशीष राठी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...