आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामखेडच्या ६० हजार लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे. वाटलं तर जीआरचा कागद त्यांना द्या. पण मंजुरी द्या, अशी चकरा मारत विनंत्या केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. आमदार राम शिंदे यांनी आयत्या मंजुरीचा कागद आणला. राजकीय श्रेयासाठी खोटे बोलले आपली संस्कृती नाही. विकासकामांना स्थगिती व खोटे बोलण्याची विचारसरणी जनतेने पचवून घेऊ नये, असे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदेंवर टीका करताना सांगितले.
दहिगाव उजनी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी आणल्याबद्दल जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पवार यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सुर्यकांत मोरे, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात रमेश आजबे, राजेंद्र पवार, विकास राळेभात, राजेंद्र गोरे, कल्लू कूरेशी, सुरेश भोसले, मोहन पवार, निखल घायतडक, महेश निमोणकर, विकी सदाफुले, प्रकाश काळे, अमर चाऊस, प्रविण उगले, वसीम सय्यद, सलिम शेख, नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, जे काम केले तेच चौकात बोर्डवर लिहिले. राम शिंदे यांनी मंत्रीपदाची ताकत जनतेच्या फायद्यासाठी नाही तर व्यक्तिगत फायद्यासाठी वापरली. मतदारसंघातील पोलिस प्रशिक्षण केंद्रासह अनेक कामे, प्रकल्प बाहेर घेऊन जाण्याची भाषा कॅबिनेटमध्ये भाजपाच्या मंत्र्याकडून झाली. तेव्हा कॅबिनेटमध्ये असुनही विरोध करण्याची हिंमत आमदार राम शिंदेंची झाली नाही.
मी संबंधित मंत्री व प्रशासनाला विनंती केली, तांत्रिक बाबी पटवून दिल्या. एसआरपी प्रशिक्षण केंद्र कुसडगावलाच ठेवण्यास सरकारला भाग पाडले.आणि विरोधक आयता कागद घेऊन खोटं बोलत आहेत. अहिल्यादेवी होळकर विकास कामासाठी आणलेल्या कोट्यवधींच्या विकास कामांना स्थगिती आणता, राजकीय श्रेयासाठीचा दूटप्पी खोटेपणा जनता जाणुन आहे. राम शिंदे हे हवेत गेलेले विमान आहे ते असेच राहु द्या, असा टोला लावला.
...अन्यथा गाठ माझ्याशी
राम शिंदे जेवढ्या कामांचे उद्घाटन करतील त्याच ठिकाणी समोर समोर जशास तसे उत्तर देऊ. मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे आणि कायम राहील, शहरातील दहशत संपवली आहे आणि पुन्हा गुंड डोके वर काढतील तर त्यांना हिसका दाखवला जाईल. पोलिसांनी चांगले काम केले तर ठीक अन्यथा माझ्याशी गाठ आहे, मंत्री तानाजी सावंत मध्यंतरी जामखेडला येऊन गेले त्यांनी तर कहरच केला. काय बोलतील याचा नेम नाही, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.