आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा गुन्हा:जिल्हा पोलिस दलातील श्वान मिशकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकातील श्वान मिशका याचे उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. लोणी व कोपरगाव पोलिस ठाण्यातील दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात श्वान मिशकाने मोठी कामगिरी केली होती. शासकीय इतमामात त्याचा अंत्यविधी पार पडला. पोलिस दलाच्या वतीने त्याला पुष्पचक्र अर्पण करुन सलामी देण्यात आली.

श्वान मिशका हा नगर पोलिस दलातील श्वान पथकामध्ये २३ मे २०१५ रोजी दाखल झाला. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०१५ ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत त्याने प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे गुन्हेशोधक प्रशिक्षण पूर्ण केले. १ ऑगस्ट २०१६ रोजी नगर पोलिस दलातील श्वान पथकात हजर होऊन व त्याने गुन्हेशोध कामकाजास सुरुवात केली. २०१७ मध्ये लोणी पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर श्वान मिशका यास पाचारण करण्यात आले होते. त्याला घटनास्थळी पडलेल्या कु-हाडीच्या दांड्याचा वास दिला असता त्याने माग काढत लोणी पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला व लोणी पोलिस स्टेशनमध्ये बसलेल्या एका इसमासमोर जाऊन भुंकू लागला व गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.

बातम्या आणखी आहेत...