आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:रोज योगा केल्याने जीवनातील ताण तणाव होतो नाहीसा; दिलीप कटारिया यांचे प्रतिपादन

नगर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्व काम करतो. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देण्यात पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर आपले दुर्लक्ष होते. व्यायामाचे आणि योगाचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. रोज योगा केल्याने आपल्या जीवनातील ताण तणाव नाहीसा होतो, असे प्रतिपादन योग साधक दिलीप कटारिया यांनी केले.

जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने आनंद योग केंद्राच्या वतीने उपनगरातून योगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तीनशे साधकांनी सहभाग घेतला. शुभम मंगल कार्यालयात आयुष्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे आसने केली. त्यानंतर रासनेनगर, सोनानगर चौक, भिस्तबाग चौक मार्ग योगा रॅली काढण्यात आली. भिस्तबाग चौकात सर्वांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली. हे प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. चंद्रशेखर सप्तर्शी, प्रतीक्षा गिते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी कटारिया बोलत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, जयश्री देशपांडे, अजित बेदरे, प्रसन्ना बांदिवडेकर, संदीप गांधी, प्रशांत बियाणी, बाळू गांधी, स्वाती वाळुंजकर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...