आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:घरेलू मोलकरणींना वाऱ्यावर‎ सोडणार नाही ; बबली रावत‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरेलू मोलकरणींचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्‍न‎ प्रलंबित आहेत. त्यांच्या भविष्याचा व जीवन‎ मरणाच्या प्रश्‍नासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.‎ त्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर‎ सोडणार नाही. शासनाने त्यांच्या प्रश्‍नांची‎ दखल घ्यावी, अन्यथा मोलकरणी रस्त्यावर‎ उतरून आपल्या हक्कासाठी आंदोलन‎ करतील, अशा इशारा राष्ट्रीय मोलकरीण‎ संघटनेच्या जनरल सेक्रेटरी कॉ. बबली रावत‎ यांनी दिला.‎

वयाच्या ६० वर्षांनंतर त्यांना पेन्शन सुरू‎ करण्याची मागणीही केली. जिल्हा घरेलू‎ मोलकरीण संघटनेचा जिल्हा मेळावा व‎ वार्षिक बैठकीत मार्गदर्शन करताना कॉ. रावत‎ बोलत होत्या. राहाता येथील संत सेना महाराज‎ मंदिरात लता डांगे यांच्या अध्यक्षतेखाली‎ झालेल्या या बैठकीसाठी कॉ. एल. एम. डांगे,‎ महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक व आरोग्य‎ संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले,‎ आयटकचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. अ‍ॅड.‎ सुधीर टोकेकर, कॉ. मारुती सावंत, कॉ. निवृत्ती‎ दातीर, आयटकचे राज्य सदस्य कॉ. सुरेश‎ पानसरे, कॉ. सतीश पवार, लीला तस्कर आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...