आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन:भाविकांसह गरजू घटकांना अन्नदान

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहरमनिमित्त जुना बजार यंग पार्टीच्या वतीने सालाबादप्रमाणे सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोहरम साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली होती. यावर्षी सर्व भाविकांना पंगतीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातील ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पैलवान यांच्या हस्ते भंडार्‍याची सुरुवात करण्यात आली. यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष इरफान बेग, शाहनवाज सय्यद, सरफराज सय्यद, ऋषिकेश कावरे, फैज भाई, मुन्नावर शेख, शाहिद वस्ताद, रफिक बागवान, राजू सय्यद, सुलतान सय्यद, नवेद शेख, शरीफ सय्यद, हंजला शेख, कुद्दूस शेख, आफताब शेख, मुआज खान उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...