आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:भगवानगडासाठी 1 कोटी 13 लाखांची देणगी, घोगस पारगाव ग्रामस्थांकडून लोकवर्गणी

पाथर्डी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भगवानगडाला मिळालेल्या देणगीतील सर्वात मोठे दान

संत भगवान बाबांच्या गरीब भक्ताच्या श्रीमंतीमुळे श्रीक्षेत्र भगवानगड कोट्याधीश होत असून भक्तांकडून मिळत असलेल्या देणगीमुळे भगवान गडावरील विकासाचा आलेख वाढत आहे. भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगाव (ता. शिरूर) या गावाने एक कोटी तेरा लाख रुपये देणगी भगवान गडाला दिली.

कोरोना सारख्या संकटातून बाहेर येत ठिकठिकाणचे ग्रामस्थ महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना गावात येण्याचे निमंत्रण देत आहेत. संत भगवान बाबाचे व ईश्वराचे आभार मानत संत भगवान बाबाच्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी देणगी देत आहेत. यापूर्वी परभणी जिल्ह्यातील बोरकिनी गावाने भगवान गडासाठी चक्क ९५ लाखांची रोख स्वरूपात देणगी दिली होती. बीड जिल्ह्यातील हिगंणी खुर्द गावाने ४४ लाख तसेच वडवणी तालुक्यातील चिचंडवडगाव येथील ११० भाविकानी ३१ लाख देणगी काही दिवसांपूर्वीच दिलेली असताना आता गडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगावने एक कोटी तेरा लाख देणगी दिली असून या गावातील बरेचशे कुटुंब ऊस तोडणीसाठी बाहेरगावी आहेत, ते आल्यावर या गावाचा देणगीचा आकडा मोठा वाढणार आहे.

भगवान गडावरील विकास कामे चालू असून गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी अत्यंत नियोजनबद्ध रितीने भगवानगडाचा विकास हाती घेतला आहे.दोन वर्ष मंदिर बंद असल्याने महंतांनी तेथे ठाण मांडून बसत दैनंदिन विकासकामांवर लक्ष केंद्रित केले होते. विकास कामे चालू ठेवली होती. आता कोरोनाच्या साथीनतंर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अहमदनगर जिल्हात शिर्डी, शनी शिगंणापूर, मोहटा देवी या मोठ्या देवस्तान प्रमाणेच भगवानगडावर दर्शनासाठी येण्याचा भाविकांचा ओघ वाढत आहे. श्रीक्षेत्र भगवानगडावरिल चालू असलेली विकासकामे गडावरील संत ज्ञानेश्वरी विद्यापीठ, गडावरील मोफत अन्नछत्र यामुळे भक्त प्रभावित होत आहे. ऊस तोड मजुराची पढंरी म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या या भगवान गडाला छोट्या गावांतून लाखो रुपये देणगी मिळत असल्याने संत भगवान बाबावरील भक्ती व त्यातून लोकवर्गणीच्या माध्यामातून एकत्रित होणारी देणगी रूपी शक्ती यामुळे गडाचा विकास जोमाने चालू आहे.

बातम्या आणखी आहेत...