आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती:जमिनीचे पाेत वाढवणारे ऊसाचे पाचरट जाळू नका; मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांचे आवाहन

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसाच्या तोडणीनंतर ७० टक्के शेतकरी ऊस पाचरट जाळून टाकत असल्याने हवेच्या प्रदुषण बरोबरच उष्णतेने जमिनीतील जीवाणू व गांडुळावर परिणाम होऊन जमिनीचे आरोग्य बिघडते. पाचरटातून नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध होते. त्यामुळे पाचरट कुट्टी करून सरीमध्ये अच्छादन केल्यास तण उगवत नाही, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी दिली.

कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी राहुरी सजा अंतर्गत १४ व १५ डिसेंबरला मंडळातील पिंप्री वळण, चणकापुर, केंदळ खुर्द व वळण या गावांमधील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऊस पाचरट व्यवस्थापन शिवारफेरी, गहू हरभरा पीक व्यवस्थापन वर्गात ते बोलत होते. यावेळी गहू व हरभरा पिकांबाबत पिके घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धतींची त्यांनी माहिती दिली.

मेघवर्मा जाधव यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहाय्यक कृषि अधिकारी मंगेश बनकर, भिमराज गडधे, राजेंद्र गरूड, फकीरचंद आगलावे, आबासाहेब लहारे, गोरख कानडे, किशोर पुंड, दिनेश पवार, भद्रीनाथ जरे, वैभव जरे, शिवाजी आढाव, अप्पासाहेब घोलवड, अशोक जरे, जालिंदर कानडे, आदी उपस्थित होते.

वळण येथे मुक्ताबाई गव्हाणे यांच्या हरभरा प्रक्षेत्रावर जावुन पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना, महाडीबीटी व शेत तळ्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी मंडळाधिकारी प्रशांत डहाळे यांनी केले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब खुळे पाटील तसेच वळण भागातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...