आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:थकबाकीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडू नका; कानडे

श्रीरामपूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेथे मीटरची मागणी आहे तेथे नवीन मीटर्स मागवावेत, ग्राहकांना त्रास देऊ नये, शेतकऱ्यांचा वीज जोड मागील थकबाकीसाठी तोडू नये, केवळ चालू बिल भरुन घ्यावेत, असे आदेश आमदार लहू कानडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले.आमदार कानडे यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात विजेच्या प्रश्नाबाबत महावितरणचे अधिकारी व ग्राहकांची एकत्रित बैठक घेऊन ग्राहकांची कामे वेळेत करण्याचे आदेश दिले.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता भंगाळे, उपअभियंता डी. एन. चावडा, देवळाली प्रवराचे उपअभियंता पी. एच. देहरकर, बाभळेश्वर सबस्टेशनचे उपअभियंता व्ही. बी. सोनवणे, तसेच ममदापूर, बेलापूर, सुतगिरणी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, देवळाली, हरेगाव, एमआयडीसी, कोल्हार उपविभागाचे सर्व शाखा अभियंता उपस्थित होते. बैठकीमध्ये डी. पी. जळणे, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य न होणे, शेतकऱ्यांना स्वखर्चाने डी.पी. भरावी लागणे, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, नवीन डी.पी. मिळणे, लार्इन शिफ्ट करणे इ. अशा अनेक प्रकारच्या तक्रारीचा पाऊस पडला.

त्यावर आमदार कानडे यांनी आवश्यक अशा शंभर डी. पी. नव्याने बसवून ओव्हरलोड डी. पी. वरील ग्राहकांना दिलासा देण्यात यावा, सेक्शननिहाय मेंटेनन्सची कामांचा सर्वे करुन मेंटेनन्स ऑर्डर्स देऊन नियोजनपूर्वक कालबध्द पध्दतीने कामे करुन घ्यावीत, अशा सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...