आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुग्ध व्यवसाय:सहकारी दूध संघच शाश्वत असल्याने खासगीच्या आमिषाला बळी पडू नका

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कर्ज वाटपप्रसंगी आवाहन

दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आहे. दूध संघ प्रपंचाशी निगडीत असल्याने कायम दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. सहकारी दूध संघ शाश्वत असल्याने खासगीच्या आमिषाला बळी पडू नका. गायी व दूध उत्पादन वाढीसाठी संघाच्या राजहंस गोधन कर्ज योजनेचा उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात राजहंस गोधन कर्ज योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मंत्री थोरात बोलत होते. महानंद व दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, संपतराव डोंगरे, स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर विनोदकुमार, शाखाधिकारी सुनीता नयनार, डेप्युटी मॅनेजर वैभव कदम, सुनील गुरुकर, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, वर्षा उबाळे, तहसीलदार अमोल निकम, मॅनेजर गणपतराव शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी ५ शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

देशमुख म्हणाले, स्टेट बँकेच्या सहकार्याने राजहंस गोधन कर्ज योजना कार्यान्वित झाली आहे. योजनेतून २० कोटी मिळणार असून २ गाईंसाठी १ लाख ६० हजार रुपये कर्ज मिळणार आहे. ९५७ उत्पादकांची कर्जसाठी मागणी आहे. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये वितरित होणार आहे. यामुळे गाईंची संख्या वाढणार असून कुटुंबाला आधार देणारे दूध उत्पादन वाढणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे अतिरिक्त दुधाचे संकट आले, मात्र यावर मात करत संघाने लौकिक जपला. स्पर्धा करण्यासाठी दूध उत्पादक व सेवा सोसायट्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्टेट बँक जनतेची बँक असून त्यांची प्रगती करणे बँकेचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. विनोदकुमार म्हणाले. २८ वर्ष दूध संघात प्रामाणिक काम केले. सर्वांचे सहकार्य मिळाले. मंत्री थोरात यांच्या तत्वांचा अनुयायी म्हणून काम केल्याचे डॉ. उबाळे म्हणाले. प्रास्ताविक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

डॉ. उबाळे यांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान
अत्यंत विनम्रपणे व अभ्यासपूर्ण २८ वर्ष संगमनेर दूध संघात काम करताना २० वर्ष कार्यकारी संचालक पद सांभाळणारे डॉ. प्रतापराव उबाळे यांनी प्रामाणिक काम केले असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. मनोगत व्यक्त करताना डॉ. उबाळे यांना अश्रू अनावर झाले.

अशी आहे राजहंस गोधन कर्ज योजना
संकरित दोन गाई खरेदीसाठी १ लाख ६० हजार रुपये कर्ज. कर्जाची परतफेड ३ वर्ष. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दूध सोसायटीची हमी आवश्यक. गाईचा विमा ३ वर्षासाठी बंधनकारक. कर्ज हप्ता दूध पगारातून कपात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...