आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गरीबांच्या संसारावर जेसीबी फिरवून राख रांगोळी करू नका : कोल्हे

कोपरगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन अडीच वर्षापासुन कोरोनाच्या महामारीमुळे कोपरगांव शहर बाजारपेठेची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. निर्बंध शिथील होत आहेत, हातावर प्रपंच असणाऱ्या घटकासमोर त्यांना दररोजच्या जगण्याचा प्रश्न मोठया प्रमाणांत असतांना नगरपालिका प्रशासन शहरातील अगोदरच्या विस्थापितांचे पुर्नवसन करत नाही, आता पुन्हा नव्याने अतिक्रमण हटवण्यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने थेट अहमदनगर येथून पोलिसांची कुमक बोलावून गोर गरीबांच्या संसारावर जेसीबी फिरवून त्यांची राख रांगोळी करू नये, अशा आशयाचे निवेदन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सर्वपक्षीय अतिक्रमणधारकांच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सोमवारी दिले. याप्रसंगी बाळासाहेब संधान, विजय वाजे, सेनेचे गटनेते योगेश बागुल, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, स्वप्नील निखाडे, मनसेचे शहराध्यक्ष सतिष काकडे, बापूसाहेब काकडे, अकबर लाला शेख, योगेश बागुल, सनी वाघ, शरद खरात, रिपाईचे प्रदेश सचिव दिपक गायकवाड प्रदेश रिपाईचे शहराध्यक्ष देवराम पगारे, अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानचे सुकदेव जाधव, कैलास येवले, कहार भोई समाज प्रदेशाध्यक्ष अशोकराव लकारे, शिवाजी खांडेकर उपस्थित होते.

कोपरगाव पालिका नगररचनाचे अधिकारी बडगुजर यांनी या निवेदनाचा स्वीकार केला.
कोल्हे म्हणाले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची दोन तीन वेळा बैठक घेऊन यावर सामोपचाराने तोडगा काढून पुर्वीच्या विस्थापीतांचे अगोदर पुर्नवसन करावे त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकावर हातोडा टाकू नये म्हणून विनंती केली होती. पालिका प्रशासन अतिक्रमण उठवण्यासाठी अहमदनगर येथून पोलिस बळ मागवून सुड बुध्दीची कारवाई करत आहे हे बरोबर नाही, तेव्हा पालिका प्रशासनाने अतिक्रमण उठविण्याची मोहिम स्थगित करावी अन्यथा येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...