आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या संख्येत दुपटीने झाली वाढ; पण 44 हजार मजूर कागदोपत्रीच

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेरोजगारांची बनाबनवी : गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात मे महिन्यात 53 हजार नोंदणीकृत बांधकाम मजुरांची झाली होती नोंद

बांधकाम मजूर म्हणून नोंदणी करण्यासाठी ना शिक्षणाची अट, ना वयाची मर्यादा. शिवाय ऑनलाईन अवघे ८५ रुपये भरा आणि बांधकाम मजूर व्हा. या कामगार कल्याण मंडळाच्या सुविधेमुळे कोरोनानंतर वर्षभरात नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली.

गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात मे महिन्यात ५३ हजार नोंदणीकृत बांधकाम मजूर होते. आता नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या ८३ हजारांवर गेली. नोंदणीकृत बांधकाम मजुरांपैकी ३९ हजार मजूरच प्रत्यक्षात कामावर असून, उर्वरित ४४ हजार मजूर हे केवळ कागदोपत्री बांधकाम मजूर आहेत. केवळ कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे मजूर झाल्याचे स्पष्ट झाले असून, बनावट बांधकाम मजुरांच्या तपासणीसाठी आता कामगार कल्याण मंडळाने स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली.

कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना बसला. कोरोनात हातचे काम गेल्यानंतर अनेकांनी मुंबई-पुणे सोडून गाव गाठलं. हाताला काम मिळावे म्हणून मोठ्या शहरातून परतलेल्या पैकी ३२ टक्के बेरोजगारांनी कामगार कल्याण मंडळाकडे बांधकाम मजूर म्हणून नोंदणी केली. मात्र, यापैकी २० टक्केच मूळ बांधकाम मजूर म्हणून काम करत आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन नोंद झालेल्या ८३ हजार मजुरांपैकी ३९ हजार मजूर प्रत्यक्षात काम करत आहेत. उर्वरित मजुरांनी केवळ कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मजूर म्हणून नोंदणी केली. नगरच्या कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाकडे गेल्या वर्षी मे महिन्यात ५३ हजार नोंदणीकृत बांधकाम मजूर होते, तर आता नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या ८३ हजारांवर गेली.

बातम्या आणखी आहेत...