आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच आदरांजली

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी होती. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी दुसऱ्याचा गुलाम होतो हि त्यांची विचारसरणी होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. काळानुरूप होणाऱ्या बदलांना सामारे जाण्यासाठी शिक्षण उपयोगी पडणार आहे आजही आपल्यापुढे अशी अनेक आवाहन असून या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांची विचारसरणी अंगीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी आदरांजली राहील असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्माकांत कुदळे, धरमचंद बागरेचा, सूर्यभान कोळपे, दिनार कुदळे, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, कृष्णा आढाव, रमेश गवळी, फकीर कुरेशी, अजीज शेख, कार्तिक सरदार, सुनील मोकळ, प्रकाश दुशिंग, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...