आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:डॉ. आंबेडकर स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करा

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या ‘ओबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासनाने जिल्हा स्तरावर लागू करण्याचा निर्णय केला आहे. तोच निर्णय मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी करावा व योजना जिल्ह्यासह तालुका स्तरावर लागू करून वसतीगृहापासून वंचित असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी दिला आहे.

शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. वर्षाकाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २१ हजार ६०० रुपये जमा करण्याचा निर्णय केला आहे. मात्र, या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार आहेत. तोच निर्णय शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करावी, अशी मागणी प्रा. खरात यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...