आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे यांची जोधपूर, येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय कोरडवाहू विभागीय संशोधन संस्थेच्या (काझरी) संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झाली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी या निवडीची बुधवारी घोषणा केली.
महाराष्ट्रातील पहिले अधिकारी
डॉ. किरण कोकाटे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण असून त्याआधी पाच वर्ष ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत विस्तार विभागाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील उपमहासंचालक हे पद केंद्राच्या कृषी मंत्रालयातील अतिरिक्त सचिवाच्या समकक्ष असून हे पद भुषविणारे डाॅ. किरण कोकाटे हे महाराष्ट्रातील पहिले अधिकारी ठरले.
637 कृषी विज्ञान केंद्राचे नेतृत्व
राष्ट्रीय पातळीवर विविध समित्यांवर कोकाटे अध्यक्ष व सदस्य म्हणून काम बघत आहेत. सध्या ते पटना येथील भाकृअप–संशोधन संकुलावर तसेच देशात नवीन कृषी सेवा केंद्रांच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. निक्राच्या तज्ञ सल्लागार समितीवर देखील सदस्य म्हणून ते आपले योगदान देत आहेत. २००९ साली डाॅ. कोकाटे यांची उपमहासंचालक पदावर निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील ६३७ कृषी विज्ञान केंद्राचे नेतृत्व करून त्या अंतर्गत असलेले दहा हजार प्रकल्प समन्वयक आणि विषय विशेषज्ञांद्वारे देशाच्या कृषी विस्ताराला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे विभागीय प्रकल्प संचालनालयाचे नामांतर कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थेत (अटारी) झाले. देशात आठवरून अकरा कृषी तंत्र उपयोजन संशोधन संस्था (अटारी) निर्माण केल्या. त्यात महाराष्ट्र राज्यात पुणे येथे एक अटारी संस्था मंजूर झाली. डाॅ. कोकाटे यांच्या या दुरदृष्टी व प्रभावशाली कार्यपद्धतीमुळे त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे शिल्पकार संबोधले जाते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम कार्यक्रमाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा अट्रॅक्ट अँड रिटर्न युथ इन अग्रिकल्चर (आर्या) या प्रकल्पामध्ये त्यांचे मोठे योगदान लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.