आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरवान्वित:डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र पुरस्काराने गौरवान्वित

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या महामारीत अविरत रुग्णसेवा करुन अनेकांचे जीव वाचविणारे डॉ. पियुष पाटील यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे यांच्या हस्ते डॉ. पियुष पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावेडी येथील माऊली सभागृहात रविवारी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी डॉ. सुधा कांकरिया, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नागेबाबा उद्योग समूहाचे कडूभाऊ काळे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, आमदार निलेश लंके, डॉ. हर्षा पियुष पाटील, डॉ. मयुरी पाटील, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...