आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबपुष्प:डॉ. जाकिर हुसेन शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प ; विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वितरण

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे वितरण करुन गुलाबपुष्प व फुगे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फैय्याज शेख, अध्यक्षा डॉ. आसमा काझी, मुख्याध्यापक समीउल्ला शेख, अल्ताफ इब्राहिम शाळेचे मुख्याध्यापक जाविद पठाण आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात समीउल्ला शेख यांनी विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ. आसमा काझी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...