आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांची माहिती:डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची पंधरा टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम

कोपरगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकारी संस्था चालवताना आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत असणाऱ्या घटकांचे हित जोपासले पाहिजे, ही शिकवण कर्मवीर शंकरराव काळे यांनी दिली. त्यांच्या आदर्श विचारांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने दरवर्षी १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा सुरू ठेवली. ही परंपरा संस्थेची आर्थिक बळकटी अधोरेखित करीत असल्याचे प्रतिपादन श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी केले. पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२१-२२ या वर्षांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गौतम बँकेच्या गौतमनगर येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आमदार काळे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे होते.

आमदार काळे म्हणाले, कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी पतसंस्था आधारवड बनली. संस्थेने संपादन केलेल्या विश्वासाच्या बळावर ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करणे, ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणीप्रमाणे तत्काळ परत करीत आहे. त्यामुळे संस्थेच्या ठेवीत सातत्याने वाढ होत आहे. यावरून संस्थेवर कर्जदार, ठेवीदार यांचा दृढ विश्वास असल्याचे सिद्ध होत आहे.

सभेच्या अध्यक्षपदाची सूचना अशोकराव आहेर यांनी मांडली, त्यास शिवाजीराव वाबळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी २०२१-२२ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजलीचा ठराव व्हाईस चेअरमन सोपानराव गुडघे यांनी मांडला. अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर काळे बी. डी. यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष बढे यांनी केले. आभार व्हाईस चेअरमन सोपानराव गुडघे यांनी मानले. यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण, सुनील मांजरे, सुभाष आभाळे, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, अरुण चंद्रे, सोमनाथ घुमरे, बाबुराव कोल्हे, सोमनाथ कांगणे, नानासाहेब चौधरी, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, व्हाईस चेअरमन धोंडीराम वक्ते, कुक्कुट पालनचे व्हाईस चेअरमन विजय कुलकर्णी, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद उपस्थित होते.

७३.५९ लाखांचा नफा
३१ मार्च २०२२ अखेर संस्थेकडे ३४ कोटी ३ लाखांच्या ठेवी होत्या. यामध्ये वाढ झाली असून आजअखेर ३६ कोटींच्या ठेवी आहेत. अहवाल सालात संस्थेने २३ कोटी ३२ लाख कर्ज वाटप केले. २२ कोटी ३९ लाखांची गुंतवणूक केली. ७३ लाख ५९ हजार रुपयांचा नफा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...