आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ सुधा कांकरिया यांची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानपूर्वक करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ सुहास पिंगळे, उपाध्यक्ष डॉ उमेश रेवणवार तसेच आयसीएमआरचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी डॉ. सुधा कांकरिया यांचे अभिनंदन केले आहे.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या सभेमध्ये डॉ सुधा कांकरिया यांचा गौरव आयएमए महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आणि रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. उमेश रेवणवार यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. त्या वेळेस रोटरीचे अध्यक्ष प्रशांत बोगवत यांनी स्वागत व सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी मानपत्राचे वाचन केले. या वेळेस डॉ. प्रकाश कांकरिया तसेच रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुधा यांना गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह तसेच अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. देशात पहिल्यांदा १९८५ मध्ये ही चळवळ डॉ. सुधाताईंनी सुरू केली. त्याचा सन्मान म्हणून आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नोंद झाली आहे. डॉ. सुधाताईंनी “नकोशीला करूया हवीशी’ या उपक्रमाद्वारे नकोशी असलेल्या मुलींचे परत नामकरण करून त्यांना नवीन जीवन दिले. तसेच विवाह सोहळ्यात आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा घ्यायला लावून एक नवीन सकारात्मक पायंडा या समाजामध्ये पाडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.