आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइलचे युग आले मोबाइलचे ,फुगेवाला आला फुगेवाला , चार नेमक्या काढा रेषा, विटा विटांच्या भिंती सरशा,अशा पाठ्यपुस्तकातील आपल्या कवितेच्या सुरांनी गुलमोहर रोड वरील पालवी शिशुविहार गजबजून गेले होते. निमित्त होतं परिवर्तन प्रतिष्ठान आयोजित मराठी कविता पाठांतर स्पर्धेचे. पालकांनी मुलांना मराठी साहित्याची ओळख करुन देऊन मराठी पुस्तकं, काव्य वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले तर आपली मराठी भाषा कायम आपल अस्तित्व टिकून राहील. ही यामागची भुमिका होती. पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. मोठ्या गटातील मुलांनी कविता सादरीकरणा बरोबरच त्याचा भावार्थही सांगितला.
या काव्य स्पर्धेला नगर मधील लेखक सदानंद भणगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण आदर्श शिक्षिका साईगीता सब्बन आणि कल्लोतीर्थ, अनादिसिध्दा या दोन कादंबऱ्यांची लेखिका भूपाली निसाळ यांनी केले. भाषा हे संवादाचे आणि कविता हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम असल्याने अशा स्पर्धांमधुन मराठी भाषेची गोडी कायम राहावी.आणि भावी पिढीची मराठी भाषेशी असलेली नाळ कधीही तुटू नये असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. निकाल पुढीलप्रमाणे : माेठा गट : प्रबोधिनी पठाडे- प्रथम, श्रावणी तेलंग - द्वितीय, ईशान खानविलकर- तृतीय. छोटा गट क्र.१ भार्गवी ओंकार वाळूंजकर-प्रथम, ऋचा अतुल शेवगांवकर- द्वितीय, साई उन्हवणे- तृतीय, तन्मय अविनाश गोटे - उत्तेजनार्थ. छोटा गट क्र.२ शुभ्रा जोशी- प्रथम, पूर्वा अविनाश सरोदे- द्वितीय, स्वामीनी अवधूत कुलकर्णी- तृतीय. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक करंदीकर, डॉ. ए. वाय. कुलकर्णी व अन्य सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी भालेराव यांनी, तर आभार प्रज्ञा असनीकर यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.