आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जीवनात ध्येय गाठण्यासाठी मोठी स्वप्ने पाहा ; वाडकर

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अहमदनगर एज्युकेशन सोसायटी’च्या निकालाची उज्ज्वल परंपरा असून, एक संस्कारक्षम शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मी याच शाळेचा विद्यार्थी असून, विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय गाठण्यासाठी मोठी स्वप्न पाहावीत, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी केले.

वांबोरी येथील महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ज्योत्स्ना तोडमल यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, तर अहवाल वाचन प्राचार्या नितीशा चावरे यांनी केले.अशोक कडूस यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आपल्या हलक्या फुलक्या विनोदी शैलीत विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेतला. प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कडूस यांनी पेन्सिलचा वापर न करता, फक्त ब्रश व रंगाच्या साह्याने फुलांचे चित्र रेखाटून विद्यार्थ्यांना अचंबित केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणित-विज्ञान, कला-रांगोळी, प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास शाळा समितीचे हेमंत मुथा, अजिंक्य झेंडे, वाडकर दाम्पत्य, अनूज पंचारिया, शिक्षक-पालक संघाचे सदस्य, मुख्याध्यापिका नितिशा चावरे, उपमुख्याध्यापिका वनीता बोऱ्हाडे, पर्यवेक्षक रवीकिरण भांड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...