आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठास भेट:शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी‎ ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त : पी. जी. पाटील‎

राहुरी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी क्षेत्रातील आयओटी, ड्रोन आणि‎ रोबोटीक्स इत्यादींचा वापर पिकांचे‎ निरीक्षण, सर्वेक्षण आणि प्रक्षेत्राचे नमुने‎ तसेच डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे‎ उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरेल,‎ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. पी. जी.‎ पाटील यांनी केले.‎ राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती व‎ जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी‎ विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत‎ भविष्यकालीन कृषी तंत्रज्ञान : आयओटी,‎ आर्टिफिशिल इंटेलिजन्स आणि ड्रोनचा‎ वापर या एक दिवसीय कार्यशाळेचे‎ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी‎ राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान‎ आयोग तसेच इंडियन इंस्टीट्यूट व‎ टेक्नॉलॉजी मुंबई येथील शास्त्रज्ञांनी भेट‎ देऊन माहिती घेतली. या कार्यशाळेसाठी‎ राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान‎ आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ए. व्ही.‎ सप्रे, सदस्य सचिव डॉ. नरेंद्र शहा,‎ संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार,‎ अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, विस्तार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे,‎ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,‎ मुंबईचे प्रा. डॉ. जे. आदिनारायणा आदी‎ उपस्थित होते.‎

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान‎ आयोगाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सप्रे‎ म्हणाले, कृषी क्षेत्र हे पारंपरिक क्षेत्र न‎ राहता एक जटिल प्रक्रिया झाली‎ असल्याने विविध क्षेत्रातील तज्ञ एकत्रित‎ येवून एकमेकांशी या विषयांवर संवाद‎ साधने गरजेचे आहे. आरजीएसटीसीचे‎ सदस्य सचिव डॉ. शहा यांनी विविध‎ क्षेत्रातील तज्ञांनी एकत्र एकत्र येऊन‎ शेतकऱ्यांसाठी काम करण्यास सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...