आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तसेच हक्काचे पीक विमा परतावे मिळाले पाहिजे, आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी स्वाभिमानाने जगला पाहिजे अशा अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा लोणी खुर्द च्या सरपंच कृषिभूषण प्रभाताई घोगरे यांनी शासनाला दिला. राहाता तहसीलवर तालुक्यातील शेतकरी कुटुंब व पशुधनासह बिऱ्हाड मोर्चा शुक्रवारी लोणी खुर्दच्या सरपंच घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्यात आला. या मोर्चात काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य सुरेश थोरात, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी, लोणीचे सरपंच जनार्धन घोगरे, निळवंडे समितीचे नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सुधीर म्हस्के, रणजित आहेर,महेंद्र शेळके , रमेश गोंदकर, नंदकुमार सदाफळ, रंजीत बोठे उपस्थित होते .
मोर्चात सहभागी शेतकरी तसेच महिला बैलगाडी व जनावरांसह सहभागी होत्या. तहसीलच्या गेटजवळ मोर्चा आला असताना तहसील प्रांगण शेतकऱ्यांना प्रवेश पोलिसांनी नाकारल्यामुळे पोलिस व मोर्चेकरी शेतकरी यांच्यात बाबानी झाली. अखेर मोर्चेकरूंना तहसील कार्यालय प्रांगण सोडले.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार राहाता तहसीलवर राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुटूंब व पशुधनासह शुक्रवारी बिऱ्हाड मोर्चा काढला. मोर्चात सहभागी शेतकरी तसेच महिला बैलगाडी व जनावरांसह सहभागी होत्या. तहसीलच्या गेटजवळ मोर्चा आला असताना तहसील प्रांगण शेतकऱ्यांना प्रवेश पोलिसांनी नाकारल्यामुळे पोलिस व मोर्चेकरी शेतकरी यांच्यात बाबानी झाली. अखेर मोर्चेकरूंना तहसील कार्यालय प्रांगण सोडले. घोगरे म्हणाल्या, सध्याचे सरकार मुलभूत गरजांकडे लक्ष न देता भौतिक गरजांकडे लक्ष देत आहे. शहरात बुलेट ट्रेन व मोठे रस्ते तयार करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार दुर्लक्षित आहे. हा देश शेतकऱ्यांवर चालत आहे. त्या शेतकऱ्यांना समृद्ध करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. नेमकी याची व्याख्या काय? याचे उत्तर त्यांनी द्यावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री पद आपल्याकडे घ्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांचा मागण्या शासनाने त्वरित मान्य करून अंमलात आणाव्यात, अन्यथा शेतकरी याचिका दाखल करणार असल्याचे घोगरे यांनी सांगितले. सुरेश थोरात म्हणाले, शासनाने शिवार फेरी करून शेतकऱ्यांकडून मुदत वाढवून ८० रुपये विमा भरून घेतला आणि अतिवृष्टी होऊनसुद्धा परतावा मात्र ५ रुपये ३५ पैसे दिला. तरी शेतकऱ्यांना पुर्ण परतावा दिला जावा. तर श्रीकांत मापारी यांनी अतिवृष्टीने शिवारातील वाहून गेलेले रस्ते त्वरित दुरुस्त करून द्यावेत.
तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार म्हणाले, अतिवृष्टी संबंधित अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्याबाबत पीक विम्यासंदर्भात बैठक झाली आहे. फेर सर्वेक्षण व पंचनामा करून जर पैसे कमी मिळाले तर उर्वरित परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. शिवार रस्ता मागणीसंदर्भात शासन यंत्रणेकडे माहिती अहवाल पाठवलेला असल्याचे तहसीलदार हिरे यांनी सांगितले. तहसीलदारांना महिलांनी दिली ठेचा व भाकरी तहसील कार्यालयाचे आवारात मोर्चेकरी शेतकऱ्यांनी तंबू ठोकून त्यामध्ये तीन दगडाची चूल मांडून शेतकरी महिलांनी भाकरी केल्या. विशेष म्हणजे तहसीलदार हिरे यांना निवेदनासोबत ठेचा व भाकरी देण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.