आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:शहरात औषध व धूर फवारणी अभियान सुरू

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य सुविधा फक्त कागदावर न ठेवता सर्वसामान्य जनतेपर्यंत घरोघरी जाऊन पोहोचाव्यात. ५० कर्मचाऱ्यांची टीम करून प्रभाग क्रमांक १ पासून औषध फवारणी व प्रभाग क्रमांक १७ पासून धूर फवारणीला सुरुवात करावी, असे आदेश उपमहापौर गणेश भोसले यांनी आरोग्य विभागाला दिले. दरम्यान, या बैठकीनंतर तत्काळ धूर व औषध फवारणी अभियान सुरू करण्यात आले.

उपमहापौर भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, मनपा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपमहापौर भोसले म्हणाले, महापालिकेच्या लसीकरणाची, देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेच्या माहितीचे फलक आरोग्य केंद्राबाहेर लावावेत. घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती पत्रिकेद्वारे आरोग्य सुविधाची माहिती द्यावी.

दरम्यान, मनपा आरोग्य विभागाच्या वतीने व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नागरिकांना देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधाची माहिती २५ नोव्हेंबर रोजीच्या महासभेमध्ये नगरसेवकांना देण्यात यावी. या योजना मोफत असून प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

कोणत्या तारखेला, कुठे धूर फवारणी?
२३ नोव्हेंबरला प्रभाग १७ मधून धूर फवारणी सुरू करण्यात आली. २४ नोव्हेंबरला प्रभाग सोळा, २५ नोव्हेंबरला प्रभाग पंधरा,२६ नोव्हेंबरला प्रभाग चौदा, २८ नोव्हेंबरला प्रभाग तेरा, २९ नोव्हेंबरला प्रभाग बारा, ३० नोव्हेंबरला प्रभाग अकरा, १ डिसेंबरला प्रभाग दहा, २ डिसेंबरला प्रभाग नऊ, ३ डिसेंबरला प्रभाग आठ, ५ डिसेंबरला प्रभाग सात, ६ डिसेंबरला प्रभाग सहा, ७ डिसेंबरला प्रभाग पाच, ८ डिसेंबरला प्रभाग चार, ९ डिसेंबरला प्रभाग तीन, १० डिसेंबरला प्रभाग दोन, १२ डिसेंबरला प्रभाग एक या नुसार सर्वच प्रभागामध्ये धूर फवारणी होणार आहे.

कोणत्या तारखेला, कुठे औषध फवारणी?
प्रभाग एकमधून औषध फवारणीचे काम सुरू करण्यात आले. २४ नोव्हेंबरला प्रभाग दोन, २५ नोव्हेंबरला प्रभाग तीन, २६ नोव्हेंबरला प्रभाग चार, २७ नोव्हेंबरला प्रभाग पाच,२९ नोव्हेंबरला प्रभाग सहा, ३० नोव्हेंबरला प्रभाग सात, १ डिसेंबरला प्रभाग आठ,२ डिसेंबरला प्रभाग नऊ, ३ डिसेंबरला प्रभाग दहा, ५ डिसेंबरला प्रभाग अकरा, ६ डिसेंबरला प्रभाग बारा, ७ डिसेंबरला प्रभाग तेरा, ८ डिसेंबरला प्रभाग चौदा, ९ डिसेंबरला प्रभाग पंधरा, १० डिसेंबरला प्रभाग सोळा व १२ डिसेंबरला प्रभाग सतरामध्ये औषध फवारणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...