आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबाची मागणी वाढली:गणेशोत्सव , शिक्षक दिनामुळे मागणी वाढल्याने गुलाबाची फुले महागली

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम गुलाबाच्या बागांवर झाला आहे. सततच्या पावसामुळे झाडावरची गुलाब सडू लागल्याने फुलांची बाजारात आवक मंदावली आहे. बाजारात आवक मंदावली असताना गणेशोत्सवामुळे गुलाबाची मागणी वाढली. त्यातच सोमवारी शिक्षक दिन असल्यामुळे गुलाबाचे फुले महागली होती. नगरमध्ये किरकोळ बाजारात गुलाबाचे प्रति एक फूल २० ते २५ रुपये दराने विकली गेले. सततच्या पावसामुळे फुल शेतीतील गुलाबाच्या बागातील गुलाबाची फुले सडू लागली आहे.

त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह किरकोळ बाजारात गुलाबाच्या फुलाची आवक मंदावली आहे. त्यातच गणेशोत्सव व गौरी गणपतीमुळे बाजारातून गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली असतानाच सोमवारी शिक्षक दिन असल्यामुळे गुलाबाच्या मागणीत वाढ होऊन भाव कडाडले. रविवारी तपोवन रोडवरील गुलाबाच्या शेतीतून ४० रुपये डझनने फूल व्यवसायिकांनी फुले खरेदी केली होती. आज मात्र किरकोळ बाजारात गुलाबाची फुले चढ्या दराने विकली गेली.

बातम्या आणखी आहेत...