आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी:पावसामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली ; सहा दिवसांपूर्वीच केली होती जलवाहिनी दुरुस्त

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहराजवळील तपोवन रोडसह ४४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बुऱ्हाणनगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी सोमवारी (१३) जूनला सकाळी पुन्हा फुटली आहे. पावसामुळे ही जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे तपोवन नगर सह या भागातील नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.दरम्यान १ जूनला या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला तडे गेल्याने ती नादुरुस्त झाली होती. त्यामुळे सात दिवस पाणीपुरवठा बंद होता. ७ जून पासून पुन्हा ही पाणी योजना सुरळीत झाली असतानाच सोमवार (१३ जून) ला या पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतून तपोवनसह ४४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. १ जूनपासून नादुरुस्तीमुळे या पाणी योजनेचा पाणी पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे तपोवन रोड व तपोवन नगर शिवाजीनगर, संत वामनभाऊ नगर,साईनगर, गजराज नगर, सह अन्य भागातील पाणीपुरवठा गेल्या सात दिवस बंद होता त्यामुळे नागरिकांना टँकरची विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागली होती. ७ जून पासून ही पाणीपुरवठा योजना सुरळीत झाली असतानाच सोमवारी या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाणी योजना नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसासाठी या पाणी योजनेवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

विळत घाटात फुटली मुख्य जलवाहिनी नगर -मनमाड रोडवरील विळद घाटात सोमवारी सकाळी बुऱ्हाणनगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. मुळा धरणातून वेळेत घाटामार्गे या योजनेची जलवाहिनी येते. या भागात रात्री झालेल्या पावसामुळे ही जलवाहिनी फुटली असावी असा अंदाज बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. दरम्यान अद्याप ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले नाही.

बातम्या आणखी आहेत...