आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओढ्या-नाल्यांना पूर:चंदनगडचा बंधारा फुटल्याने शेती पिकांचे मोठेे नुकसान

संगमनेर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगगमनेर तालुक्यातील पेमगिरी, निमगाव, सावरचोळ, नांदुरी परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शुक्रवारी पेमगिरी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने चंदनगड येथील माती बंधारा मुसळधार पावसामुळे फुटल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे.

ओढ्याच्या लगत असलेल्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या ऊस, डाळिंब, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे ओढ्याकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे व निमगाव खुर्दचे सरपंच संदीप गोपाळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...