आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामात व्यत्यय:मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नातून मंजूर रस्त्याचे काम वनविभागाने थांबवले ; कामात व्यत्यय : अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी अहवाल उपवनसंरक्षकांकडे ठेवला

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदार संघातील वांबोरी ते शेंडी रस्त्यांचे काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. परंतु, याच जिल्हा मार्गातील वांबोरी घाटातील काम वनविभागाने परवानगी घेतली नसल्याच्या कारणास्तव महिनाभरापासून थांबवले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी अहवाल उपवनसंरक्षकांकडे ठेवला असल्याचे सांगितले.

नगर-वांबोरी रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत प्रचारात चांगलाच गाजला होता. राहुरी मतदार संघातून प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने मंत्रीपदही मिळाले. पदाच्या माध्यमातून मंत्री तनपुरे यांनी वांबोरी ते शेंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे तसेच याच मार्गावरील घाट ते वांबोरीपर्यंत रुंदीकरणाचे काम मंजूर करून आणले. रस्त्याच्या कामाला उन्हाळ्यात गती देण्यात आली. परंतु, वांबोरी घाटात काम सुरू असतानाच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते काम बंद पाडले.

घाट परिसर हे राखीव वनक्षेत्र असल्याने या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, अशी कोणतीही परवानगी सार्वजनिक बांधकाम अथवा विकासकाने घेतली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काम बंद असल्यामुळे घाटाची दुरवस्था होऊन अनेकजणांना अपघात होत आहेत. याप्रश्नी काही सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...