आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर शहरात गुरुवारी दुपारी ३.३० वाजता अचानक विजेच्या कडकडाटांसह वादळ वारा व जोरदार पाऊस झाला. शहरातील काही परिसरात गाराही पडल्या. अर्धा तास सुरु असलेला वादळीवारा व पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर झाडे व विजेचे पोल उन्मळून पडली. शासकीय विश्रामगृहासमोर एका ट्रकला विजेच्या खांबाच्या तारा अडकल्याने पोल खाली पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.अचानक सुरू झालेल्या या वादळामुळे अनेक दुकानावरील बोर्ड उडून रस्त्यावर पडली होती. व्यावसायिकांची धांदल उडाली होती. अनेकांनी दुकाने सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. शहरातील उपनगरातील अनेक भागात पाणी साचले होते. अर्धा तास सुरु असलेल्या वादळाने नागरिकांची चिंता वाढवली होती. दरम्यान, बुधवारी रात्री तालुक्यातील समनापूर, कोल्हेवाडी, वडगावपान या भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ऊसतोड कामगारांच्या कोप्यात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे हाल झाले. अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. तर घरे व गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने धान्य भिजले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.