आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेश टिळेकरांचा आरोप:राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी समाजांचे आरक्षण गेले

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आघाडी सरकार विश्वासघातकी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा व ओबीसी समाजांचे हक्काचे आरक्षण गेले आहे. असा आरोप बुधवारी (ता. 15) ला भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला.

अहमदनगर शहरात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी समाजाच्या जागर मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी खासदार सुजय विखे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, मेळाव्याचे संयोजक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, महामंत्री शंकर वाघ, शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे आदी यावेळी उपस्थित होते.

तर..शिक्षण, नोकरीतील आरक्षण जाईल

टिळेकर म्हणाले,आज जर ओबीसी समाज जागृत होऊन पेटून उठला नाहीतर भविष्यात शिक्षण व नोकरी मधील आरक्षणही हे विश्वासघातकी सरकार घालवेल. असा आरोप त्यांनी केला.

ओबीसींसाठी रस्त्यावर उतरणार

ओबीसी समाज भाजपाचा आत्मा आहे. आडनावावर ओबीसी ठरवणे अशक्य आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी येणाऱ्या काळात भाजप अधिक आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरेल असा इशारा टिळेकर यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...