आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप:वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात अनेक भागांतील वीज पुरवठा 16 तास खंडित

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या विलनीकरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी संघटनेने बुधवार (४ डिसेंबर) ला संप पुकारून अहमदनगरच्या मुख्य महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी विलणीकरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वीज अनेक तास गुल झाली होती. दरम्यान राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर हा संप अखेर मागे घेण्यात आला.दरम्यान राज्य सरकारचे काम हे दडपशाही व हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेले माजी उर्जा राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडळातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. त्याच्या निषेधार्थ महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप सुरू केला होता. संघटनेचे उपाध्यक्ष सतीश भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संपत धीरज गायकवाड, अमित तिजोरी, गणेश कुंभारे, रावसाहेब बांदल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक तास रोहित्राची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे कामकाज ठप्प झालेले होते. दरम्यान आंदोलनकर्त्यांची माजी ऊर्जा राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेऊन संपला समर्थन दिले.

कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर
हे व्यासपीठ राजकीय नाही मात्र विधानसभेत याबाबत आम्ही घोषणा दिल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला बोलून दिले नाही. दडपशाही सुरू आहे. हुकूमशाही पद्धतीने हे सरकार काम करत आहे असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केला.

३२ संघटनांचा सहभाग
महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात ३२ संघटना सहभागी झाले आहेत सर्वांनी एकत्र मिळून हा संप केला आहे. असे सतीश भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कामे ठप्प झाली होती.

प्रशासकीय कार्यालये दिवसभर अंधारात
जिल्ह्याचे प्रमुख प्रशासन असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे दालन असलेल्या परिसरात सकाळी अंधार दिसून आला. त्याचबरोबर अन्य प्रशासकीय कार्यालयात देखील वीज गुल झाल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते.

बातम्या आणखी आहेत...