आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोल्हेगाव येथील बेपत्ता युवक विजय भगवान कुर्हाडे याचा मृतदेह गुरूवारी सकाळी नागापूर परिसरात आढळून आला होता. त्याचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे त्याचा मृतदेह पुणे येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.
विजय भगवान कुऱ्हाडे हा युवक सोमवारपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. गुरूवारी सकाळी कुऱ्हाडे याचा मृतदेह काकासाहेब म्हस्के कॉलेज रोडवर आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला. मात्र, विजयचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांनी पुणे येथे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनसाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.